रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने “आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण” या विषयावर पुणे महानगरपालिकेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकांकरिता, ०२ ऑगस्टला, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक हॉल येथे प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ह्या प्रकल्पाद्वारे, सुमारे ३०० शाळांतील हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काल ०२ऑगस्ट रोजी, सुमारे १५० शिक्षकांचे प्रशिक्षण रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांच्याकडून आयोजित करण्यात आले. ह्या वेळी, रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या अध्यक्ष दीप्ती पुजारी आणि रोटरी पर्यावरण प्रमुख संतोष परदेशी, ह्यांनी या प्रकल्पाची रूपरेषा सांगितली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षमा गांगोली आणि मोहन पुजारी ह्यांनी केली. या दरम्यान, रोटरी ३१३१ प्रांतपाल – मंजू फडके,पुणे महानगर पालिकेचे उप आयुक्त राजीव नंदकर ( शिक्षण प्रबोधिनी), उप आयुक्त महेश पाटील (आपत्ती व्यवस्थापन), आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने ह्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि श्री विवेक नायडू, डॉ राजेंद्र सराफ आणि श्री जैदीप मालवीय ह्यांनी शिक्षकांस प्रशिक्षण दिले. ह्या कार्यक्रमात, क्लब सेक्रेटरी शिल्पा राजे, भावना चाहुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र – १) प्रशिक्षण वेळी उपस्थित मान्यवर .२)प्रशिक्षणार्थी शिक्षकगण.