रोटरी क्लब फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी श्रीकांत मडघे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष निखिल टकले यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिव पदी शिरीष प्रभू यांची निवड करण्यात आली. हॉटेल सयाजी येथील पर्ल सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल मंजु फडके, सहाय्यक प्रांतपाल समीर भिडे, स्वप्नील शेंडे(व्यावसायिक) आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी, सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत मडघे यांनी आगामी काळात महिला सशक्तिकरण, पर्यावरण व विद्यार्थी या क्षेत्रांत प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
छायाचित्र : श्रीकांत मडघे.