रोटरी क्लब ऑफ शिक्रापुर तर्फे नूतन पदग्रहण सोहळा २०२३-२०२४ हॉटेल मिडास रिजन्सी , चाकण रोड येथे संपन्न झाला. याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजू फडके , सहायक प्रांतपाल किरण परमार , संस्थापक अध्यक्ष रो. वीरधवल करंजे , अध्यक्ष रो.डॉ. मिलिंद भोसुरे, सेक्रेटरी रो. विठ्ठल वाघ,रो. मयूर करंजे , रो. सदाशिव आण्णा पवार , इ. मान्यवर तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर पदाधिकारी , सदस्य , व इतर ग्रामस्थ सदर कार्यक्रमास उपस्थित होते. रो. डॉ. मिलिंद भोसुरे यांची अध्यक्ष , रो. विठ्ठल वाघ यांची सेक्रेटरी , रो. प्रीतम शिर्के यांची खजिनदार , व सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळेस गेल्या १० वर्षातील रोटरी क्लब ऑफ शिक्रापुर तर्फे विविध शाळा अनुदान , आरोग्य तपासणी , ब्लड डोनेशन , वृक्षारोपण, कोरोना मदत कार्य , व इतर सामाजिक कार्याची माहिती मावळते अध्यक्ष रो. वीरधवल करंजे यांनी दिली. तसेच नूतन अध्यक्ष रो. डॉ. मिलिंद भोसुरे यांनी ह्या वर्षात करण्यात येणाऱ्या नवीन विविध सामाजिक प्रोजेक्टस , जातेगाव खुर्द येथील कामाच्या नियोजनाची माहिती दिली. नवीन मैबर्स रो. दिलीप शिवले , रो. अभिजीत मासळकर , रो. सचिन लांडे यांनी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले.यावेळेस विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या १० लोकांचा प्रशस्तीपत्रक देउन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन रो. मयुर करंजे यांनी केले. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मंजू फडके यांनी ह्या वर्षातील सर्व कार्यासाठी शुभेच्छा व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या अध्यक्ष पदी मिलिंद भोसुरे यांची निवड.
Tags: #aaj ka anand, #lokmat, #loksatta, #maharashtra times, #pudhari, #punya nagri, #rotary dist 3131, #sakal, #samna