रोटरी क्लब औंधच्या अध्यक्षपदी अजय देशकर.

Share This News

रोटरी क्लब औंधच्या अध्यक्षपदी अजय देशकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुखानंद जोशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली तर सचिवपदी राजेंद्र शेलार यांची निवड करण्यात आली. हॉटेल सयाजी येथील पर्ल सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रांतपाल मंजु फडके होत्या. या समारंभास सन्मानित पाहुणे दत्ता देशकर(जलतज्ञ), सहाय्यक प्रांतपाल समीर भिडे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष अजय देशकर यांनी आगामी काळात जल सुरक्षा, व्यावसायिक प्रशिक्षण, पर्यावरण, हॅप्पी व्हिलेज, अंगणवाडी, महिला नेतृत्व विकास आदी क्षेत्रांत विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.

छायाचित्र : अजय देशकर