रोटरी क्लब पुणे शिवाजीनगरच्यावतीने विद्यार्थ्यांना सैन्या विषयी माहिती साठी रायला संपन्न.

Share This News

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या वतीने विद्यार्थ्या सैन्या विषयी माहिती व कारगिल तसेच अन्य लढा याविषयी माहिती व्हावी या हेतूने रायला म्हणजेच रोटरी युथ लिडरशिप अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर येथे करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्ष स्मिता जोग,सचिव भारती डोळे,डायरेक्टर युथ अलका कांबळे,प्रमुख पाहुणे लेफ्ट जनरल सुदर्शन हसबनिस(रिटा),मेजर जनरल आलोक देब(रिटा), कर्नल मिलिंद ठोसर(रिटा),ले.कर्नल संजय बोरसे.ले.कर्नल प्रशांत काकडे, मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र झुंजारराव,एनसीसीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.या प्रसंगी मान्यवरांनी सैन्याची उज्ज्वल परंपरा, कार्यपद्धती,सैन्याने कारगिल- लडाख  व अन्य ठिकाणी केलेली  कामगिरी याची सविस्तर व प्रेरक माहिती दिली व सैन्यात जावून देशसेवा करण्याचे व्रतच आंगीकारावे असे प्रतिपादन केले.

छायाचित्र : रायला प्रसंगी मान्यवर व विद्यार्थी.