रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगरच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार(व्यावसायिक गुणवत्ता)देवून सन्मानित करण्यात आले. मॉडर्न कॉलेज गणेशखिंड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे पद्मश्री प्रतापराव पवार, सन्मानित पाहुणे माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपुर, रोटरी क्लब लोकमान्य नगरच्या अध्यक्ष डॉ. मधुरा विप्र, व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद सोवणी, रवींद्र विप्र आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानित पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे- विष्णु मनोहर(सुप्रसिद्ध शेफ), निलेश निमकर(शैक्षणिक कार्य), सचिन व्यवहारे(दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल), डॉ.संजय खरात(शैक्षणिक कार्य). मानपत्र व रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी बोलताना डॉ.दीपक शिकारपूर यांनी समाजात व्यवसाय व सेवा क्षेत्रांत अनेक जण ऊतम कार्य करीत असतात, रोटरी क्लब द्वारे त्यांचा सन्मान करून प्रोत्साहन दिले जाते असे प्रतिपद्न केले. मधुरा विप्र यांनी मोठे यश व उत्तुंग कार्य करणारे लोक हे बुद्धीमत्ता, कठोर परिश्रम व मनाचा ठामपणा यामुळे यशस्वी होतात असे संगितले. सत्काराला उत्तर देतांना पुरस्कारार्थी यांनी आपले यश एकट्याचे नसून कुटुंब,कर्मचारी व समाज सर्वांचे असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासवी मुळे यांनी केले.आभार प्रदर्शन मनोज आगरवाल यांनी केले.