रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटी व साई सर्व्हिस सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने जनवाडी गोखलेनगर येथील किलबिल शाळेस रु तीन लाख पंधरा हजार रुपयांची सायन्स लॅब – प्रयोगशाळा साहित्य प्रदान करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब स्पोर्ट सिटीचे अध्यक्ष सँम्युअल केनेडी, स्कूलचे संस्थापक रफिक सौदगर, मालती कलमाडी(साई सर्व्हिस), पद्मश्री प्रमोद काळे, नेहा निरगुडकर(मुक्तांगण). आदी मान्यवरांच्या बरोबरच शाळेचे कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सँम्युअल केनेडी यांनी उपलब्ध साधनांचा उपयोग उत्तमपणे करून चांगले यश मिळविता येते असे संगितले. मालती कलमाडी यांनी शिक्षणात स्त्री पुरुष समानता हवी फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही शिक्षण व संस्कार मिळाले पाहिजे असे संगितले. प्रमोद काळे यांनी शिक्षण हे शिक्षक व विद्यार्थ्यानी एकत्रित पणे बनविले पाहिजे असे संगितले. रफिक सौदागर यांनी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही उत्तम दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे असे प्रतिपादन केले.
छायाचित्र : विद्यार्थी विद्यार्थिनी व मान्यवर यांचे समूहचित्र.