रोटरी क्लब सहवासच्या वतीने “मम्मी”(MUMMY- मल्टी युटीलिटी मोबाइल मेडिकल यान) या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण प्रांतपाल पंकज शहा यांच्या हस्ते करण्यात आले. मल्टी स्पाईस हॉटेल डिपी रस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ही संकल्पना साकार करणारे रोटरी क्लब सहवासचे अध्यक्ष महेंद्र चित्ते,सहप्रांतपाल शिरीष पुराणिक,वन नेटवर्कचे समीर कुलकर्णी,शाश्वत हॉस्पिटलचे डॉ.आर.एस करमरकर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व या प्रकल्पात सहभागी मान्यवर उपस्थित होते. या व्हॅन मध्ये डॉक्टर,नर्स,औषधे असतील.आठवड्यात दोन दिवस शहरी तर 3 दिवस ग्रामीण क्षेत्रांत ही व्हॅन रुग्णांना सेवा प्रदान करणार आहे. यासाठी सुमारे सोळा लाख खर्च झाला असून या व्हॅनचे तांत्रिक संचालन शाश्वत हॉस्पिटल करणार आहे. या प्रसंगी बोलताना पंकज शहा यांनी रोटरी समाजातील गरजू नागरिकापर्यंत पोचून याद्वारे सेवा करणार असल्याचे प्रतिपादन केले. महेंद्र चित्ते यांनी आरोग्य सेवा सर्वांना मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.
छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी मान्यवर.