रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना चे रोटरी वर्ष 2022-23 अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर अमित आंद्रे व सचिव रोटेरियन डॉक्टर उमेश फलक यांच्या पदग्रहणाचा समारंभ हॉटेल डेक्कन रॉयल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रांतपाल रोटेरियन डॉक्टर अनिल परमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात प्रांतपाल डॉक्टर अनिल परमार यांनी अध्यक्ष डॉ अमित आंद्रे, सचिव डॉ उमेश फलक व सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टरस ना रोटरीच्या पिन्स देऊन त्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. गतवर्षीचे अध्यक्ष रो. शिरीष पिंगळे व सचिव प्राची आंद्रे यांनी त्याच्या वर्षात केलेल्या कामाचा लेखा जोखा सादर केला. त्यांनतर अध्यक्ष डॉ अमित आंद्रे यांनी त्यांच्या नवीन वर्षात करावयाच्या विविध योजना सांगितल्या.त्यात प्रामुख्याने पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, क्लब डिजिटायझेशन यासारख्या महत्वाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रांतपाल डॉ अनिल परमार यांनी त्यांच्या भाषणातून रोटरी जिल्ह्याच्या विविध योजना सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. ममता कोल्हटकर व रो. सारिका रानडे यांनी केले. रो. सुधाकर पवार यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्लब च्या सर्व सदस्याचे सहकार्य लाभले
छायाचित्र :मान्यवर व रोटरी डेक्कन नवनियुक्त पदाधिकारी यांचे समूह चित्र.