रोटरी क्लब अपटाऊनच्या वतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित केले. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अदीती मुटाटकर यांना “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार” (व्होकेशनल एक्सलन्स) माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. अंध व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्य करणार्या बाबासाहेब राऊत यांना ‘चिराग”पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र,स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. “आदर्श शिक्षक” पुरस्कार अनिता बोर्डे( माजी मुख्याध्यापिका सेंट अॅंड्र्युज स्कूल) यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुना क्लब येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी, माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटरी क्लब अपटाऊनचे अध्यक्ष पोपटराव चव्हाण, सचिव अनुप कर्णिक. डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर अजय वाघ, युवा रोटरी सदस्य(रोटरॅक्ट) व अपटाऊन कुटुंबिय उपस्थित होते. रश्मी कुलकर्णी यांनी हे सन्मान देताना आपलाच सन्मान होत आहे असे वाटते असे प्रतिपादन केले. सत्कारार्थिनी बोलताना या पुरस्काराने आजून मोठे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असे संगितले.
छायाचित्र :सन्मानार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र