पुणे: संपूर्ण देशातील धरणांची सुरक्षा व देखभाल व्हावी यासाठी गेल्या दहा वर्षांपासून लाखो किलोमीटरचा प्रवास करून 12000 हजार पत्रव्यवहार ,3500 याचिका अंतर्गत वेळोवेळी प्रतिवर्षी धरण सुरक्षा व देखभाल संबंधी शासन ,प्रशासन यांना दखलपात्र पाठपुरावा केला त्याचा परिणाम राज्यात धरणांची बाह्य सुरक्षा व देखभाल संबंधी शासनाने कार्यवाही सुरू केली पण ती कासवगतीने चालू आहे काही ठिकाणी मनुष्यबळ व आर्थिक निधी अभावी प्रलंबित आहे तर काही ठिकाणी पण दुर्लक्षित आहे धक्कादायक बाब राज्यातील महत्वाची मोठी धरणे 50 टक्के गाळानेच भरली गाळ उपसा कार्यवाही धरणावरती राबविली नाही पाटबंधारे मंडळात 14 हजार नोकऱ्यांची नुसतीच घोषणा झाली परंतु कसलीही कामे आजतागायत नसल्याने दिपक नामदेवराव बच्चेपाटील 8 ऑगस्ट 2022 पासून बेमुदत आमरण उपोषणाला डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे बसणार आहेत शासनाचे सर्व नियमांचे पालन करून हे आमरण उपोषण करण्यात येणार आहे सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरवात होणार असून एकदिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषण होणार असून नंतर त्यांचे कार्यालय A-26 , H Block ,MIDC पिंपरी येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण होणार आहे सदर उपोषणाला रमेश बाळकृष्ण दिवाने ,अरुण पवार, सुनील दिगंबर लांडगे व राजाभाऊ शिवतरे अशी एकूण पाच लोक बसणार असून मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक देखील यात सामील होणार असल्याची माहिती दिपक नामदेवराव बच्चे पाटील यांनी दिली राज्यातील धरणांची सुरक्षा व देखभाल होण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून काम करीत आहे परंतु आजतागायत कसल्याही स्वरूपाची उपाययोजना किंवा ठोस निर्णय घेतला जात नाही राज्यातील पाटबंधारे मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,अधीक्षक आणि संचालक तथा जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने बेमुदत आमरण उपोषण करणार आहे ज्येष्ठ नागरिक देखील आमरण उपोषणास मोठ्या प्रमाणात येणार असल्याने पाटबंधारे मंत्रालय ,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आजपर्यंत देशातील 18 राज्यांनी व शेकडो शासकीय उच्च अधिकाऱ्यांनी धरण सुरक्षा व देखभाल संदर्भातील कामाचा गौरव केला परंतु राज्यशासन सर्व पुरावे देऊन देखील दखल घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली
छायाचित्र : दीपक बच्चेपाटील