पुणे (दि.२३) डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे यांनी दम आणि इंद्रधनुष्य या क्रीडा आणि विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धांतील विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण श्री कृष्णराज धनंजय महाडिक (ब्रिटीश फॉर्म्युला ३ चॅम्पीयन विजेते,व युट्युबर) यांच्या हस्ते संपन्न झाला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनिता आढाव,डेक्कन एज्युकेशन सोसायटी कौन्सिल सदस्य अमित कुलकर्णी,डॉ. सविता केळकर,कार्यक्रमाचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक प्रज्ञा यादव, सहाय्यक प्राध्यापक अजिंक्य वाघमारे, सहाय्यक प्राध्यापक संदीप बोरसे,सहाय्यक प्राध्यापक पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवरांच्या बरोबरच शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना कृष्णराज महाडिक यांनी तरुणांनी आपला उत्पन्नातील काही भाग गरजूंसाठी खर्च करावा असे प्रतिपादन केले. अॅड.अशोक पलांडे यांनी युवकांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे असे सांगितले. डॉ.सुनिता आढाव यांनी अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळते असे सांगितले. छायाचित्र : डावीकडून डॉ.स्मिता केळकर,अॅड अशोक पलांडे,कृष्णराज महाडिक,अमित कुलकर्णी,डॉ.सुनिता आढाव.