पुणे (दि.२) डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालया अंतर्गत समिती तर्फे लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH)जनजागृती तसेच बैठकीचे “पुकार २.०” याचे आयोजन नुकतेच करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड अशोक पलांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमात डॉ.सुनिता आढाव यांनी स्वागतपर भाषण केले.व पॉश कायद्याचे महत्व अधोरेखित केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व घटक शाळा व महाविद्यालयाच्या अंतर्गत समितीचे सदस्य यासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अॅड.राजश्री ठकार होत्या. अॅड शाळीग्राम,अंजली पेंडसे,यांची मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोल प्ले च्या माध्यमातून कायद्यातील विविध परिभाषा सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या.त्यानंतर दैनंदिन जेईनात कामाच्या ठिकाणी स्त्रीची अस्मिता आणि सुरक्षितता कशी जपली जाईल या बाबत प्रश्नोत्तर व निवेदन तसेच अनुभव कथन करण्यात आले. महाविद्यालया तर्फे सहाय्यक प्राध्यापक पूजा देव यांनी निवेदन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व पुकार २.० च्या मागील सखोल विचार महाविद्यालयाच्या अंतर्गत समितीच्या पीठासीन अधिकारी डॉ.ऐश्वर्या यादव यांनी केले.