19 वर्षाखालील मुलींच्या टी -20 लीग संघाची निवड चाचणीतील प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी -स्वप्नील मोडक

Share This News

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागवान यांनी 19 वर्षाखालील मुलींच्या टी -20 लीग सामन्यासाठी केला पक्षपातीपणा -स्वनिल मोडक पुणे :महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाझ बागवान यांनी टी-20 लीग सामन्यासाठी निवड करताना पक्षपातीपणा केला असल्याचा आरोप पुणे वारीयर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक स्वप्नील मोडक यांनी केला आहे पुणे वारीयर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे स्वप्नील मोडक यांनी अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये मुला -मुलींना प्रशिक्षण देऊन खेळाडूंची प्रतिभा ओळखून मुलांना राष्ट्रीय व राज्यस्तरावर मार्गदर्शन केले आहे 19 वर्षांच्या मुलींसाठी टी -20 लिगसाठी निमंत्रण सामने घेऊन नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली परंतु निमंत्रण सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना डावलून दुसऱ्याच खेळाडूंना संधी देण्यात आली ज्या खेळाडूंनी निमंत्रण सामना किंवा शिबिरात भाग घेतला नाही तरी देखील रियाझ बागवान यांच्या सांगण्यावरून निवड करण्यात आली कोणत्याही सामन्यांचे स्कोर कार्ड ऑनलाइन दाखविले गेले नाही रियाझ बागवान यांच्या कार्यपद्धतीमुळे चांगला खेळ करणाऱ्या गुणवंत खेळाडूंना वगळण्यात आल्याचा स्पष्ट आरोप स्वप्नील मोडक यांनी केला आहे 19 वर्षाखालील मुलींच्या टी -20 लीग संघाची निवड चाचणीतील प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी रियाझ बागवान यांची करून कारवाई करावी अशी देखील मागणी स्वप्नील मोडक यांनी बी.सी.सी.आय चे सचीव मा.जय शहा यांना पत्राद्वारे केली आहे