दिघी गांव कोरोना मुक्त समितीस चंदूकाका सराफ &सन्स प्रा.लि कडून ५०० लिटर सँनिटायझर व १००० मास्क प्रदान.

Share This News

कोरोना प्रतिबंधासाठी सर्व पक्षीय गावकरी यांनी स्थापन केलेल्या दिघी गांव कोरोना मुक्त समितीस चंदूकाका सराफ &सन्स प्रा.लि.कडून ५०० लिटर सँनिटायझर व १००० मास्क प्रदान करण्यात आले.राघव मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सुप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ.दीपक शिकारपुर,नगरसेवक विकास डोळस,नगरसेविका निर्मला गायकवाड,अलका जोशी,माजी नगरसेवक चंद्र्कांत वाळके,चंदूकाका सराफ प्रा.लि.चे भरतेश दानवे,गोमतेश मागदुम, संजय गायकवाड,संतोष तानाजी वाळके,संतोष बबन वाळके,कृष्ण ज्ञानोबा वाळके,अशोक कशिद,आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.दीपक शिकारपुर यांनी “कोरोना पुर्णपणे कधीच समाप्त होणार नाही.उपायांनी तो कमजोर होईल,सर्वांचे लसीकरण महत्वाचे आहे.तसेच यातील नव्या उद्योग संधी गावकर्‍यांनी शोधल्या पाहिजे असे संगितले.समिति सदस्यांनी केलेल्या कार्याचा आढावा सादर केला व यापुढे ही अशीच एकी ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.