*बिझनेस आयकॉन* मॅगझिनच्या *’नवदुर्गा २०२१’* उपक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. या वेळी बिझनेस आयकॉनचे *फाउंडर अँड सीईओ श्री पराग गोरे* उपस्थित होते. नव्याने उद्योगात येणाऱ्या उद्योजकांना टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या यशोगाथांपेक्षा आपल्या सभोवतालीच वावरणाऱ्या उद्योजकांमधून प्रेरणा मिळाल्यास ती त्यांना जवळची वाटू शकते, त्यातून उद्याचे नवे उद्योजक तयार होतील. तसेच महिला उद्योजिका देखील आज समाजात अग्रेसर असून त्या आपल्या कामातून देश घडविण्यात मोठे योगदान देत आहेत असे मत श्री गोरे यांनी व्यक्त केले. यावेळी पर्यावरण पूरक घरांची निर्मितीत योगदान देणाऱ्या आर्किटेक्ट अंशुल गुजराथी, किडझ वेअर क्षेत्रातील दीप्ती अचार्य, मेडिकल डेटा अनॅलिस्ट क्षेत्रातील डॉ. मधुरा विप्रा, LED लाईट्स क्षेत्रातील मानसी बिडकर, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील पल्लवी साबळे, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील रेश्मा मुल्ला, इन्शुरन्स – स्मिता भोलाणे, जुन्या मौल्यवान साड्यांना रिसायकल करून देणाऱ्या सुवर्णरेखा देवधर तसेच नेचरोपॅथीतील डॉ. विनया पुंडे या महिलांचा सन्मान पुस्तक रूपात त्यांचे कर्तृत्व शब्दबद्ध करून करण्यात आला. श्री. गोरे यांनी त्यांना मोमेंटो देऊन गौरविले. सदर कार्यक्रम दि प्राईड हॉटेल, शिवाजीनगर येथे पार पडला.
छायाचित्र : सन्मानार्थी व आयोजक.