कोरोना महामारीत असंख्य तरुणांना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्या. या अनुषंगाने त्यांना पुन्हा नोकरी मिळवून त्यांचे आर्थिक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस गिरीश भेलके व पुनीत जोशी यांनी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले. आशीष गार्डन येथे संपन्न झालेल्या या उपक्रमात संपूर्ण जिल्ह्यातील इछुकांनी सहभाग घेतला. ३० कंपन्यांनी यात सहभाग घेत उमेदवारांची निवड केली यात ९४० पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व पुण्याचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केले. नियुक्तीपत्र मिळालेल्या युवकांनी आयोजकांचे आभार मानले.आगामी काळात सुद्धा अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे आयोजक गिरीश भेलके यांनी पत्रकात नमूद केले.
छायाचित्र : नियुक्तीपत्र प्रदान करताना चंद्र्कांत दादा पाटील,गिरीश भेलके व अन्य.