पुणे (दि.२३) बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी या छोट्याशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील हरहुन्नरी युवक अमोल भगत याची अमेरिकेच्या मानाच्या असणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय सेटल फिल्म फेस्टिव्हल वॉशिंग्टन मध्ये परीक्षक (ज्युरी)म्हणून निवड करण्यात आली आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून आणि शेतकरी कुटुंबातून अमोल भगतचा खडतर प्रवास सुरु झाला होता.त्याच्या बारा वर्षाच्या भारतीय चित्रपट सृष्टीच्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे.आतापर्यंत २१ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून त्याने काम केले आहे .तसेच त्याचा आगामी हिंदी चित्रपट “पुणे टू गोवा”लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या झालेल्या या निवडीने भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये तसेच बारामती आणि त्यांच्या गावातील नागरिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून त्याच्या आगामी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अमोल भगत यांनी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मिळालेल्या संधीचे श्रेय आई वडील व बारामतीकरांना दिले आहे. आई वडील आणि मित्र परिवार यांच्या खंबीर साथीने हे यश मिळाल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. तसेच या संधीचे सोने करून मराठी माणसाचा व भारताचा ठसा अमेरिकेत उमटवण्याचा निर्धार व्यक्त केला