*सर्वोच्च न्यायालय व देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जवाबदारीने काम करणार्यांची गरज आहे; कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन* *शिवसेना पुणे शहराच्या वतिने सुरू केलेले कोविड केअर सेंटर पुणेकरांच्या सेवेत रुजू* *राज्यभरात सरकारला समांतर असे शिव सैनिकांचे काम- खा. संजय राऊत* *कोव्हीड केयर सेंटर उभारून शिवधनुष्य हाती घेण्याचे काम शिवसैनिकांनी केले- डॉ. नीलम गोऱ्हे*

Share This News

पुणे, दि. ९ मे २०२१: कोरोनाच्या पहिल्या लाटिपेक्षा आताची दुसरी लाट भयानक आहे. परंतु यामध्ये न घाबरता  कशे बाहेर पडू यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीला माहाराष्ट्र ज्या पद्धतीने सामोरे जात आहे त्याच कौतुक सर्वोच्च न्यायालय व देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः केले परंतु या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जवाबदारीने काम करणार्यांची आवश्यकता आहे. सरकार पातळीवर घेतलेल योग्य निर्णय आणि निर्णयाला जनतेची साथ यामुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे. याच क्रमात पुण्यात सुरू केलेले हे कोव्हीड केयर सेंटर लोकांना योग्य सेवा पुरवेल असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुण्यातील कोरोना हद्दपार करण्यामध्ये पुणे शहर शिवसेनेचा खारीचा वाटा असावा व सर्वसामान्य रूग्णांना सर्व उपचार उपलब्ध व्हावे या उद्देशाने कात्रज परिसरात कै.ताराबाई हनुमंत थोरवे लाईफ केअर हाॅस्पिटलचे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आ. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खा संजयजी राऊत साहेब (शिवसेना नेते), ना. नीलम गो-हे (उपसभापती विधान परिषद), मा. रविंद्रजी मिर्लेकर (उत्तर महाराष्ट्र समन्वयक उपनेते), मा. बाळाभाई कदम (संपर्कप्रमुख पुणे) मा. आमदार महादेव बाबर, डॉ. रवींद्र शिसवे (पुणे पोलीस सहआयुक्त), रवींद्र आगरवाल (सामाजिक कार्यकर्ते), श्याम देशपांडे (सहसंपर्कप्रमुख), गजानन थरकुडे (शहरप्रमुख), नितीन वाघ (विधानसभा प्रमुख), राहुल जेकटे, ओंकार जगताप (विभाग प्रमुख), अजय परदेशी (विभाग संघटक), सनी गवते (विधानसभा अधिकारी), दिपक जगताप, संदिप नवले, अजय परदेशी जयराज थोरवे, हरीष आगरवाल, अमित थोरवे, दिपक आगरवाल, डॉ. दिपक शिंदे व सहकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी ५० ऑक्सिजन बेड, ७० आयसोलेशन बेड, १ व्हेंटिलेटर असे सुसज्ज असलेले ४ मजली कोविड केअर सेंटर मध्ये सर्व प्रकारची योग्यती उपचार सेवा उपलब्ध आहे. या सर्व सेंटरची संकल्पना व निर्मिती शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे अॅड. संभाजी थोरवे (शहर समन्वयक) व कल्पनाताई थोरवे (संपर्क संघटिका) हरिश अगरवाल यांनी स्वखर्चाने केली आहे.

*कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले,* समोर येणारी परिस्थिती रोखण्यासाठी आपल्याला मेडिकल रिस्पॉन्स, सोशल रिस्पॉन्स, कॉर्पोरेट रिस्पॉन्स स्वतः घेणे महत्त्वाचे आहे. राज्यात जनतेसाठी दिवस-रात्र जी सेवा सर्वांच्या मार्फत चालू आहे ती जेवढी करू तेवढी कमीच आहे, चौवीस तास देखील कमी पडत आहे, हा काळ आपल्याला कधीही विसरता येणार नाही. याप्रसंगी त्यांनी पुण्यातील शिवसैनिक व त्यांच्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

*खा. संजय राऊत म्हणाले,* कोव्हीडच्या संकटासंदर्भात मुख्यमंत्र्यांची तळमळ रोज पाहतो आणि त्यांच्या भाषणातून ती आपल्या प्रत्येक शब्दाशब्दात दिसते. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील या परिस्थितीचा जो आभ्यास केला आणि त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे असा अभ्यास जर इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केला असता तर तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. केंद्राने किंवा केंद्रातील आरोग्य विभागाने काय केले महित नाही पण सर्वोच्च न्यायालयाने ज्या टास्कची निर्मिती केली तो टास्क महाराष्ट्राने गेल्या वर्षभरापासून राबवला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच आणि महाराष्ट्राच कौतुक जगभरात होत आहे. इतर राज्यत कोण काय करतोय हे मी आवर्जून पाहत असतो परंतु महाराष्ट्रात आपण का व्यवस्थीत काम करू शकतोय करण शिवसेना म्हणून सामाजिक जाणिवेची जी मुहूर्तमेढ स्व. बाळासाहेबांनी रोवली ती आज प्रत्येक शिवसैनिक पुढे नेतोय. सरकार समांत शिवसैनिक कोव्हीड केयर सेंटर निर्माण करताय, स्वतः ते चालवताय यामुळे प्रत्येकाला योग्य सेवा उपलब्ध होत आहे आणि त्यामुळे सरकारचा ताण कमी होऊन मोठ सहकार्य होत आहे. यामुळेच सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांची कौतुकाची थाप मिळवण्यासारखी परिस्थिती आपण निर्माण करू शकलो यासाठी सर्व शिवसैनिक कौतुकाचे पात्र आहेत.

*डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,* शिवसैनिक हे सरकार आणि समाज या मधला दुवा आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे काम आणि सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे काम सातत्याने राज्यातील जनते समोर जात आहे. पुणे शहरातील नागरिकांसाठी शहर प्रमुख संजय मोरे आणि थोरवे कुटुंबीयांनी हे कोव्हीड केयर सेंटर उभारून शिवधनुष्य हाती घेण्याचे काम केले आहे याचा मला अभिमान वाटतो. “कोणी वंदा,कोणी निंदा; काम करणे हाच आमचा धंदा” या उक्ती प्रमाणे शिवसेना पुणे काम करत आहे याचही कौतुक वाटते. यावेळी त्यांनी या कोव्हीड केयर सेंटर मध्ये अन्नदानासाठी रुपये पन्नास हजार देण्याचीही घोषणा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरप्रमुख संजय मोरे केले तर आभार अॅड. संभाजी थोरवे यांनी मानले.