आम आदमी पार्टीची “दूध प्या पार्टी”.

Share This News

३१ डिसेंबर नववर्ष स्वागत करताना मद्य सेवन पार्टीने अनेकदा असे स्वागत केले जाते. मात्र आम आदमी पार्टी पुणे शहरच्यावतीने आम आदमी पार्टीच्या खडकवासला मतदार संघ अध्यक्ष कृष्णा गायकवड यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी “दारू नको दूध प्या पार्टीचे आयोजन करण्यात आले” .धनकवडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक कृष्णा गायकवाड, प्रमुख पाहुण्या सहकार नगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते डॉ.अभिजीत मोरे, घनश्याम मारणे, विनोद जवळकर, दीपक पाटोळे, राजेंद्र कामठे, दीपक पाटील, आकाश घोलप, अतुल मडकर, अक्षय सुतार, आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांनी “मद्याच्या सेवनाने आजकालची तरुण पिढी आपले आयुष्य बरबाद करीत आहे. त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळेच अशा उपक्रमातून व्यसन मुक्तीचे कार्य होणे ही चांगली बाब आहे” असे संगितले. कृष्णा गायकवाड यांनी “व्यसना मुळे आपली व इतरांची मानसिकता बिघडवली जाते, याचा सर्वांनाच त्रास होतो.व्यसनमुक्ती हे आमचे ध्येय असल्याने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.  

छायाचित्र :डावीकडून स्वाती देसाई,अभिजीत मोरे,कृष्णा गायकवाड व अन्य.