अबुधाबी येथील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरास भारतातील २९ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेशातील माती व जल अर्पण.

Share This News

प.पु.प्रमुखस्वामीजी महाराज यांचे आशीर्वाद आणि प.पु.ब्रम्हविहारी स्वामी यांच्या अथक परिश्रमातून (BAPS)बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था ही अबुधाबी (UAE)येथे सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधत आहेत. या बांधकामाच्या पायामध्ये हितेंद्र सोमाणी यांनी ३२ दिवसात १५५०० कि.मी रस्त्यांनी भ्रमण करून २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशातून संकलित केलेली पवित्र माती व जल अर्पण केले. या माती आणि पाणी मुळे संपूर्ण भरता बरोबर या मंदिरास संपर्क मिळेल. अनेक भारतवासी या मंदिरामध्ये दर्शनासाठी आकर्षित होतील असे त्यांचे ठाम मत आहे. हे मंदिर २०२५ पर्यन्त पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेशात  सुद्धा कोठे भव्य मंदिर निर्माण होत असेल तेथेही ही माती आणि जल देण्यात येईल असे हितेंद्र सोमाणी यांनी नमूद केले आहे.