आपले उत्साही व्हॉलेंटियर श्री भालचंद्र जगताप यांच्या मोटरसायकलला काही मॉडिफिकेशन करून श्री तेजस शिंदे यांनी अभिनव कल्पनेतून एक पाण्याचा पंप बसवला. यामुळे टेकडीवरील झाडांना पाईपने पाणी देणे एकदम सुलभ झाले आहे.
ARAI टेकडीवरील हरितकरण आणि झाडांना वाढवण्याचा तळमळीने प्रयत्न करणारे श्री भालचंद्र जगताप आणि अभिनव कल्पना राबवून अशा प्रयत्नांना बळ देणारे श्री तेजस शिंदे या दोघांचेही मनापासून कौतुक. खरे तर त्यांचे केलेले कौतुक हे कमीच पडणार आहे.
जेव्हा सगळीकडे वृक्ष तोड चालते, झाडांची काळजी घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतःचे रिसोर्सेस लावून सार्वजनिक ठिकाणची झाडे वाढवणाऱ्या सर्व निसर्गप्रेमींचे मनःपूर्वक आभार.