पुणे (दि.११) रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रलच्या वतीने थॅलेसेमिया ग्रस्त बालकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हडपसर मेगा सेंटर येथे संपन्न झालेल्या या शिबिरात ९४ नागरिकांनी सहभाग घेतला यात महिलांची संख्या ही लक्षणीय होती. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रलचे अध्यक्ष सोमिनाथ तनपुरे, सचिव आशीर्वाद तुपे, खजिनदार भरत चौधरी, पंकज मुंदडा, रंजन पराडकर, महेंद्र लुणिया आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना महेंद्र लुणिया यांनी थॅलेसेमिया ग्रस्त बालकांना ठराविक कालावधी मध्ये नियमितपणे रक्त द्यावे लागते. याला मदत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
छायाचित्र : रक्तदाते व मान्यवर.