“आगामी कालखंडात नोकरी ही स्थिर व उत्पन्नाचे साधन राहणार नाही, ब्राहमण युवकांनी उद्योग व्यवसायाची कास धरावी, तसेच व्यवसायातून उजळ लक्ष्मी मिळवावी जी वाजत गाजत आणता येते, गैर मार्गाने चुकीच्या बाबी करून आणलेली लक्ष्मी ही स्नान गृह अथवा सोफ्यात लपवावी लागते. एकमेकांना व्यवसायात सहाय्य करावे स्पर्धे पेक्षा सहकाराने अधिक प्रगति होते”. असे प्रतिपादन बीबीएन नेटवर्क ग्लोबल असोसिएशनचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. ते “परिवर्तन”या ब्राह्मण उद्योजकांच्या आगामी परिषदेच्या माहितीचे अनावरण प्रसंगी बोलत होते. सीएमए भवन कर्वे नगर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महेश जोशी, श्वेता इनामदार, विनायक देशपांडे, सुयोग नरवणे, संजय भार्गवे आदी मान्यवरांच्या बरोबरच ब्राह्मण उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते.
छायाचित्र : मार्गदर्शन करताना श्रीपाद कुलकर्णी.