“कोणतीही बाब चांगली की वाईट हे आपल्या दृष्टीकोनावर ठरते,आपण सकारात्मक असल्यास कोणत्याही संकटाचा परिणाम आपल्यावर होत नाही.”- आचार्य अभयशेखर सूरीश्वरजी

Share This News

) “कोणतीही बाब ही चांगली की वाईट हे आपल्या दृष्टीकोनावर ठरते, नकारात्मक दृष्टी राहिल्यास सर्व अडचणी संकट मोठे वाटतात,मात्र सकारात्मक दृष्टी असल्यास अडचण – संकट छोटे आहे असे वाटते. कोणतेही दुख खूप मोठे समजून आत्महत्या करणे पाप आहे. असे प्रतिपादन आचार्य अभयशेखर सुरीश्वरजी यांनी केले. ते गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे मानसिक स्ट्रेस-ताणतणाव कसा दूर करावा या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यात सुमारे १००० भाविक उपस्थित होते. राजीव शहा यांनी स्वागत केले. लाभार्थी परिवार ज्योत्स्नाबेन राजीव शहा, पुष्पाबेन भरतभाई शहा परिवार, या कार्यक्रम प्रसंगी भरतभाई शहा, अशोकभाई शहा, धिरूभाई शहा, नयन शहा, दिलीप शहा, अर्णिक शहा,रिची शहा  आदी मान्यवरांच्या बरोबरच मुनी आणि साध्वीगण  उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जैन अॅलर्ट ग्रुपने केले. याच कार्यक्रमात मुंबई येथून दिव्येश व्होरा, दीप्तीबेन व्होरा परिवार दीक्षा मुहूर्तासाठी आले होते.    

छायाचित्र : आचार्य अभयशेखर सुरीश्वरजी मार्गदर्शन करताना.