कलाकार व बॅक स्टेज आर्टीस्ट यांच्या मदतीसाठी होणार १२ तास जादूचे विक्रमी प्रयोग.

Share This News

लॉकडाऊनमुळे गेले 15 महिने संपूर्ण कलाक्षेत्र बंद आहे. याचा मुख्य फटका या क्षेत्रातील सहाय्यक कलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्या बरोबरीने जादूगार, लोककलावंत यांनाही बसला. गणपती, नवरात्र तसेच एप्रिल-मे महिन्यातील कार्यक्रम सुद्धा होऊ शकले नाहीत. या कलाकारांना मदत करण्यासाठी समाजातील अनेक घटक, संस्था पुढे आल्या आणि त्यांना धान्यवाटपही केले परंतु त्यांच्या बाकी गरजा जसे की लाईटबिल, घरभाडे, पेट्रोल, मेडिकल यासाठी खिशात पैसाच शिल्लक राहिला नाही. एवढे दिवस लाईमलाईट मध्ये राहिल्यावर आता ह्या परिस्थितीत कोणापुढे कसा हात पसरायचा ह्याच विचाराने कलाकार मेटाकुटीला आला पण कोणालाही मदत मागितली नाही परंतु त्यांची हीच हतबलता 3 जादूगार मित्रांनी जाणली आणि त्यातून निर्माण झाला सलग 12 तासांचा जादूचा प्रयोग करण्याचा विचार!
पुण्याचा जादूगार प्रसाद कुलकर्णी, भुजंग वाघ आणि रायगडचा भरत काकडे असे तीन जादूगार मित्र एकत्र आले आणि त्यांनी तिघात मिळून सलग 12 तास प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमासाठी कोणतेही मानधन न घेता हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत आणि जमा झालेली रक्कम गरजू कलाकारांना देणार आहेत. हा विक्रमी शो फेसबुक लाईव्हद्वारे विनामूल्य असला तरी या जादूगार मित्रांनी समाजाला आवाहन केले आहे की, तुम्ही घरी बसून संपूर्ण कुटुंबासह जादूचा आनंद लुटा आणि खरोखरच आमची जादू तुम्हाला आवडली, आमची 12 तासांची मेहनत तुम्हाला भावली तरच फक्त 99/- मदत करा. आपण हिंदी सिनेमा बघायला जाताना तो चांगला आहे की वाईट हे माहीत नसतानाही प्रत्येकी 500-600 रुपयांचे तिकीट सहज काढतो परंतु इथे तुम्ही आधी आमचा कार्यक्रम बघा आणि जर तुमच्या मुलांच्या, कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो तरच फक्त संपूर्ण कुटुंबाच्या वतीने फक्त 99/- मदत करा. ही मदत कलाकारांना खूप मोठी ठरणार आहे.
या 12 तासांमध्ये तुम्हाला तिन्ही जादूगारांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या शेकडो जादू बघता येणार आहे.
हा प्रयोग रविवारी 30 मे रोजी सकाळी 10 वाजता चालू होणार आहे आणि त्यानंतर सलग रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. तुम्हाला हे जादूचे प्रयोग ‘मॅजिक वर्ल्ड इव्हेंट’ या फेसबुक पेजवर बघता येणार आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.
https://www.facebook.com/magicworldevent/

सर्व कलाकार मित्रांना विनंती आहे की हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावा..