कोरोना महामारी मुळे यंदाच्या वर्षी प्रतिपंढरपूर समजल्या जाणा-या विठ्ठलवाडी येथे मंदिर उघडणार नाही. त्यामुळे गेले २१ वर्ष सुरू असणारी रोपे वाटप परंपरा कायम ठेवत श्री स्वामी बॅग्ज पुणे व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार २० जुलै २०२१ रोजी तुलसी व औषधी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप राजाराम पूल सिंहगड रोड, व सिंहगड रोड येथील लसीकरण केंद्र – १)स्व.रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव लसीकरण केंद्र, २)कुद्ळे पाटील गार्डन माणिकबाग, ३)हणमंतराव गणपतराव जगताप मनपा शाळा हिंगणे खुर्द, ४)बहूद्देशीय हॉल विश्रांती नगर, येथे सकाळी १० वजता वाटप सुरु होईल. लसवंत व्हा रोपे घ्या व ऑक्सिजन मोफत मिळवा असा या उपक्रमाचा हेतु असल्याचे श्री स्वामी बॅग्ज पुणेचे राहुल जगताप व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे बाळासाहेब परदेशी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
छायाचित्र :वाटपासाठीची रोपे.