छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले यांच्या जन्मतारखे बाबत निर्णय घेण्यासाठी १९६६ मध्ये महाराष्ट्र शासनाने ९ सदस्यीय समिती नेमली. सन २००० पर्यंत या समितीने निर्णय दिला नाही. परंतु निर्णय घेण्यास वेळ लागत असल्याने १९ फेब्रुवारी १६३० या काल्पनिक तारखेला शिवजयंती करावी असे सूचविले. महाराष्ट्र शासनाने तसा निर्णय घेतला आणि आज अखेर महाराष्ट्रात सर्वत्र १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती केली जाते.
सन २००० नंतर सन २००४ मध्ये जेम्स लेन याचे ‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामीक इंडिया ‘ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्या पुस्तकातआक्षेप घेण्याजोगे लेखण असल्याने तीव्र विरोधाचे पडसाद उमटले.
पण बहुजन समाजाला हे समजले नाही की या सगळ्या प्रकारात एक विसंगती निर्माण झाली आहे. जेम्स लेन याचे पुस्तक बॅन झाले पाहिजे अशी मागणी करणारा बहुजन समाजाच १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करतोय आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व ऐतिहासिक संदर्भा बाबत शंका निर्माण होते आहे. या गंभीर त्रुटीमूळे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात हेराफेरी होते आहे, ही बाब आणि यामागे अअसणारी विसंगती समाजाला नजरेस आणून देण्याचा उद्देशाने जिजाऊ सन्मान कृती समितीने सर्व समाज बांधवांना विनंती केली आहे की शिवजयंती ८ एप्रिल रोजीच केली पाहिजे.
याबाबत चे आवश्यक निवेदन महाराष्ट्र राज्य सरकार यांना, योग्य पुरावे देऊन समितीच्या वतीने पाठवले जाणार आहे.
असे समितीच्या वतीने वासंती नलावडे यांनी सांगितले