पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे मानद अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळविहीरे येथील महर्षी वाल्मिक विद्यालय, कोंढव्यातील जडावबाई दुग्गड विद्यालय, बारामती येथील शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शेजवलकर सरांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा प्रेमलता आबनावे यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रसंगी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे संचालक प्रथमेश आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कांबळे, महर्षी वाल्मिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना कुलुंगे जडावबाई दुग्गड विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भालके, शीतल आबनावे, विभा आबनावे आदी उपस्थित होते
प्रसाद आबनावे म्हणाले, “शेजवलकर सर आणि संस्थेचे गेल्या ५० वर्षांचे नाते होते. मानद अध्यक्ष म्हणून गेल्या पाच दशकांत संस्थेच्या विस्तारात सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाने एक आधारवड गमावला आहे. संस्थेच्या वतीने, आबनावे परिवाराच्या वतीने शेजवलकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” (more…)