पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेने केंद्रीय बजेट लाईव्ह पहिले.

Share This News

 

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या सदस्यांनी एकत्रित लाईव्ह पाहिले. यादव व्यापार भवन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास आहेरकर, उपाध्यक्ष मनोज चितळीकर, सचिव स्वप्नील शहा, सहसचिव उमेश दांगट, खजिनदार प्रसाद देशपांडे, माजी अध्यक्ष शरद सूर्यवंशी, श्रीपाद बेदरकर, आदी मान्यवरांच्या बरोबरच सदस्य उपस्थित होते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सदस्यांनी यावर विविध मते मांडली. या प्रसंगी बोलतांना अध्यक्ष विलास आहेरकर यांनी “या दशकातील पहिला अर्थसंकल्प व १०० वर्षात झाला नसेल असा अर्थसंकल्प या वर्षी सादर होईल असे संकेत मिळाले होते. त्या दृष्ठीने पायाभूत सुविधा, असंघटित क्षेत्र यावर मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली. दिसते त्यामुळे रोजगारसंधी उपलब्ध होतील. तसेच क्रयशक्ती वाढीस लागेल”. असे संगितले. मनोज चितळीकर यांनी बोलताना “शेती क्षेत्रावर मोठी तरतूद केलेली दिसते परंतु आयकरा बद्दल ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. तसेच जीएसटी सुलभीकरणाची तरतूद केली नाही असे संगितले.

छायाचित्र : केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण पाहतांना सदस्य.