हडस हायस्कूल नागपूरचा पुणे चॅप्टर स्थापन.

Share This News

पुणे (दि.१०)  पुणे डेक्कन जिमखाना येथे हडस अल्युमिनाय असोसिएशन नागपूर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत संघटनेच्या “पुणे चॅप्टर”च्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुमारे ७० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नागपूरहून संस्थेचे अध्यक्ष किरण दुरुगकर, कोषाध्यक्ष सी.ए प्रसाद धारप, तसेच पुणे चॅप्टरच्या नवनियुक्त संचालिका वंदना तुळजापूरकर जकाती हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात “द्या कर दान भक्ती कर” या सामुहिक प्रार्थेनेने झाली व त्यानंतर वंदना तुळजापूरकर जकाती यांनी प्रास्तविक केले व विद्यार्थ्यांनी या संस्थेत आणि त्यांच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर अध्यक्ष किरण दुरुगकर यांनी संस्था स्थापनेपासून म्हणजेच २०१७ सालापासून संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर कोषाध्यक्ष सी.ए प्रसाद धारप यांनी संस्थेचे आतापर्यंत ६९३ सभासद असून शाळेने इतक्या पिढ्या आजपर्यंत घडविल्या त्या मानाने ही संख्या नगण्य असल्याचे व त्यात येत्या वर्षामध्ये लक्षणीय वाढ झाली पाहिजे असा संकल्प केला. संस्थेच्या भविष्यातील योजनांबद्दल थोडक्यात माहिती त्यांनी दिली. त्याला प्रतिसाद देत २०-२२ विद्यार्थ्यांनी आजीवन सभासदत्व स्विकारले. कुठल्याही शाळेची अशी माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत संघटना असणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे, व ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
छायाचित्र : पुणे चॅप्टर स्थापना प्रसंगी मान्यवर.