उद्योग दिंडी २०२५ उद्योजकतेला दिशा देणारा ऐतिहासिक उपक्रम.

Share This News

पुणे (दि.२८) “एकमेका सहाय्य करू आवघे होऊ श्रीमंत”, या ब्रीद वाक्याला अनुसरून ज्येष्ठ उद्योजक –इंजिनियर स्व.माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने प्रदीर्घ परंपरा लाभलेली दिंडी व आधुनिक कार्यकाळातील उद्योजकता या दोन्हींचा संगम साधणारा व उद्योजकता वाढीचा उपक्रम “उद्योग दिंडी” कार्याक्रमचे आयोजन दिनांक ३१ जानेवारी रोजी MDS बँक्वेट अँड लॉन्स,रावेत,पुणे दिनांक १ फेब्रुवारी रोजी मेरीगोल्ड बावधन, पुणे तर दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एमराल्ड हॉल, अमानोरा क्लब हाऊस,पुणे येथे या तिन्ही दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत संपन्न होईल. कार्यक्रमाचे आयोजन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन मा. अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल मा.सुहास फडणीस, डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे, विभावरी ब्राह्मणकर रिजन हेड, पुणे वेस्ट रिजन, रोहित केसकर रिजन हेड, पुणे सेन्ट्रल रिजन, श्रीनिवास जोगीपेठकर रिजन हेड, पुणे इस्ट रिजन, महेश इनामदार PCMC रिजन यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुढील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री मा.ना उदय सामंत, प्रतिमाताई किर्लोस्कर, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, कविता कोपरकर, गिरीश मालपाणी, शंतनू देशपांडे, रवींद्र प्रभुदेसाई, सचिन मालपाणी, अनिरुद्ध देशपांडे, डॉ.सचिन जोशी असे अनेक मान्यवर आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक यावेळी उपस्थित उद्योजकांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करणार आहेत तसेच नेट्वर्किंगच्या माध्यमातून उद्योजकांना यावेळी व्यवसाय वाढीसाठी कनेक्टस मिळण्यास मदत होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून उद्योजकांसाठी खास आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्ध करावी. ही विनंती.