पुणे (दि.२६) रोटरी क्लब पर्वती व बिझनेस आयकॉन पी आर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उत्तम कर्तुत्व गाजविणाऱ्या ९ महिलांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. मराठा चेंबर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक पराग गोरे(संस्थापक), श्रीकृष्ण चितळे(चितळे बंधू), अॅड वैशाली भागवत(सायबर सिक्युरिटी तज्ञ) रोटरी क्लब पार्वतीच्या अध्यक्ष वृषाली खिरे आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बिझनेस आयकॉनच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात आपल्या उद्योगाविषयी श्रीकृष्ण चितळे व अॅड. वैशाली भागवत यांची प्रकट मुलाखत पराग गोरे यांनी घेतली. सन्मानित महिला पुढील प्रमाणे आहेत – शारदा परांजपे,मेघा ढोरजे, स्वाती गायकवाड ,नुपूर जोगळेकर, प्रणोती कुलकर्णी, शारदा लुणिया, पल्लवी पुरंदरे, सीमा घोणे ,उन्नती दुगड, याप्रसंगी बोलतांना पराग गोरे यांनी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
छायाचित्र : सत्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.