रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रलच्या अध्यक्षपदी सोमीनाथ तनपुरे यांची निवड.

Share This News

पुणे (दि.५) रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रलच्या अध्यक्षपदी सोमीनाथ तनपुरे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रंजन पराडकर यांच्याकडून त्यंनी सूत्रे स्विकारली. सचिवपदी आशीर्वाद तुपे यांची निवड करण्यात आली. मराठा चेंबर्स ऑफ हडपसर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भावी प्रांतपाल संतोष मराठे रोटरी पदाधिकारी, सदस्य, व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी विघ्नहर्ता गोल्ड फौंडेशन यांच्यातर्फे त्यांच्या सीएसआर अंतर्गत एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला. क्लब या रकमेचा उपयोग मेडिकल प्रोजेक्टसाठी करणार आहे ज्यात रायझिंग मेडिकल हॉस्पिटल खराडी यांच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांच्या प्रसूती साठीचा खर्च मोठ्या प्रमाणावरकमी करण्यात येणार आहे. तर थेलेसामिया या आजाराच्या रक्त चाचण्या विविध कॉलेजेस मध्ये मोफत करण्यात येणार आहे. आणि या प्रकल्पासाठी शहरातील सर्व कॉलेजेस रोटरी क्लब हडपसर सेन्ट्रल, रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल खराडी किंवा विघ्नहर्ता गोल्ड फौंडेशनला संपर्क करू शकतात.

छायाचित्र : सोमीनाथ तनपुरे.