पुणे (दि.२५) वयाच्या १७ व्या वर्षी स्वतःला सिद्ध करून लेखिका बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारी ऋज्वी भविष्यात एक मोठे यश प्राप्त करेल असे विधान लोकांचा आवडता ९४.३ फेव्हर एफएम चा रेडीओ निवेदक आरजे तरुण यांनी केले.क्लाऊड ९९ हिंजवडी येथे ऋज्वी ढोकणे हिने लिहिलेल्या द फॉरेस्ट क्रोनिकल ( the forest Chonicles) या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. आरजे तरुण यांनी तिची मुलाखत घेत या पुस्तकाबद्दल अनेक प्रश्न विचारले.ऋज्वी हिनेही हसत आपल्या खास शैलीत उत्तरे देवून पाहुण्याची मने जिंकली.आपण लिहिलेल्या पुस्तकाबद्दल अनेक प्रसंग सांगितले.मुलाखत प्रसंगी आरजे तरुण यांचे ही मन भारावून गेले,त्यांनी ऋज्वी हिचे खूप कौतुक केले.या प्रसंगी उपस्थित लेखिका उर्मी रुमी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आज कालची लहान मुले मोबाईल – इंटरनेटच्या तांत्रिक जगात हरवून गेली आहेत,यात बदल झाला पाहिजे,या लहान वयात ऋज्वीने एव्हडे धाडस करून आपल्या आयुष्यातील पहिला टप्पा जिंकला आहे.तिच्या या वयातील मुलांना एव्हडी समज नसते पण तिने हे पुस्तक लिहिले,तिचे करावे तेव्हडे कौतुक कमी आहे.तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. सी.एम इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका इक्बाल कौर राणायांनी ही ऋज्वीच्या पालकांचे आभार मानले.यावेळी ऋज्वीची आई – सुजाता मेंगाणे यांनी ऋजुता स्वताहून सर्व शिकत गेली,स्वतः लिखाण केले,तिचा कल ओळखून आम्ही तिला प्रोत्साहन दिले असे सांगितले.कार्याक्रमचे सूत्र संचालन श्रावी ढोकणे हिने केले,ऋज्वीच्या लहान बहिणीने केलेल्या या सूत्र संचालनाने कार्यक्रमास अजून बहर आला.पुस्तकाचा आढावा दिशा शुक्ला यांनी सादर केला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यव उपस्थित होते.शीतल मेंगाणे,प्रसाद ढेकळे,डॉ.भावना अंबुडकर यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम हिंजवडी मधील क्लाऊड ९९ येथे संपन्न झाला. छायाचित्र : पुस्तक प्रकाशन प्रसंगी मान्यवर.