जगप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांना मा. बाळासाहेब दाभेकर यांच्या हस्ते शिवशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफल,मानपत्र,श्री शिवशंकर मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच सुप्रसिद्ध गायक साईराम आय्यऱ, कु.संस्कृती बालगुडे, उद्योजक कन्वजितसिंग संधू यांना ही शिवशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. निलेश आर्टिस्ट, विनायक रामपुरे, विवेक खटावकर तसेच अनेक कलाकारांचा सत्कार करण्यात आला. मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्याक्रमात साईराम अय्यर यांनी हिन्दी मराठी अनेक युगुलगीते एकाच वेळी स्त्री व पुरुष अशा दोन्ही आवाजात हुबेहूब म्हणून उपस्थितांची दाद मिळविली. या प्रसंगी बोलतांना वासुदेव कामत यांनी कला,संकृती,चित्र,काव्य,गायन,संगीत या मुळे माणसाला मनुष्यपण मिळाले आहे. यात बिलकुल रस नाही असे म्हणणारे लोक म्हणजे शेपूट नसलेले पशुच असे प्रतिपादन केले. या प्रसंगी बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, अनिल येनपुरे, संदीप पाटील, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र : वासुदेव कामत यांना पुरस्कार प्रदान करतांना बाळासाहेब दाभेकर व अन्य मान्यवर.