भरत मित्रमंडळाच्या महाशिवरात्र उत्सव समितीच्यावतीने सुनंदाताई पवार(ज्येष्ठ कृषी उद्योजक व आ.रोहितदादा पवार यांच्या मातोश्री)यांना अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल श्रीफळ मानपत्र,श्री शंकर मूर्ती,व पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.मा.प्रियाताई बेर्डे(लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी) यांना शिवगौरव पुरस्कार बाळासाहेब दाभेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफळ,मानपत्र,श्री शिवशंकर मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप होते. तरुण कलाकार श्री आकाश रणधीर यांना व ब्रेजन ग्रोगरी यांना शिवगौरव पुरस्कार बाळासाहेब दाभेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सुप्रसिद्ध कलाकार श्री मकरंद अनासपूरे यांचा सत्कार करण्यात आला.शाल श्रीफळ,पगडी,मानपत्र व श्री शिवशंकर प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते. मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा.आ.उल्हासदादा पवार, निरंजन दाभेकर,जयवंत वाडकर,अनिल येनपुरे,राजेंद्र पंडित,काका भगत,निलेश वावरे,निलेश आर्टिस्ट,किरण सावंत,राजेंद्र लवाटे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मकरंद अनासपूरे यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ मुलाखतकार मिलिंद कुलकर्णी यांनी घेतली. अनासपूरे यांनी मुलाखतीत आपला जीवन प्रवास विनोदी किस्से सांगून रंजकपणे सांगितला त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
छायाचित्र :पुरस्कार प्रसंगी मान्यवर.
टिप :आपल्या सुविधेसाठी ही प्रेसनोट www.peoplesmediapune.com येथे युनिकोडमध्ये उपलब्ध आहे.
सत्काराला उत्तर देताना सुनंदाताई पवार यांनी आपण जरी प्रसिद्ध अशा पवार कुटुंबात सून म्हणून असलो तरी राजकीय ऐवजी शेतकरी व सर्वसामान्य यांच्या सेवेचे कार्य करीत असून पाणी प्रश्ना वर कार्य करीत असल्याचे संगितले.तसेच पुरस्कार रक्कम पाणी फाउंडेशन साठी मकरंद अनासपूरे यांच्या सुपूर्त केली.