स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रोटरी क्लब प्राईडच्या वतीने ७५ चित्रांच्या प्रदर्शनाचे भानूप्रताप बर्गे यांच्या हस्ते उद्घाटन.

Share This News

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त रोटरी क्लब प्राईडच्या वतीने  प्रख्यात चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या ७५ चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी पोलिस उपयुक्त(गुन्हे) भानूप्रताप बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. दर्पण कला दालन गोखलेनगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, रोटरी क्लब प्राईडचे अध्यक्ष उज्वल केले, सुमेघाताई चिथडे(SIRF), चित्रकार मिलिंद मुळीक, शामकांत कोटकर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना भानूप्रताप बर्गे यांनी देशसेवा म्हणजे सगळ्यांनी सीमेवर जावून लढायचे नसते तर आपल्या आजूबाजूला असणार्‍या गरजूंची सेवा-मदत केल्यानेही देशसेवा घडते असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :डावीकडून भानूप्रताप बर्गे, उज्वल केले, सुमेघाताई चिथडे, रश्मी कुलकर्णी, शामकांत कोटकर, मिलिंद मुळीक.