रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या अध्यक्षपदी मधुरा विप्र.

Share This News

रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या अध्यक्षपदी रो.डॉ.मधुरा विप्र यांची निवड करण्यात आली.  मावळते अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. तसेच संदीप दंडगव्हाळ यांची सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. तर राकेश पवार यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. दिगंबर  सभागृह येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या नियोजित प्रांतपाल मंजु फडके, सहाय्यक प्रांतपाल अशा आमोणकर, माजी प्रांतपाल मोहन पालेशा व दीपक शिकारपुर, सुनीता कराड आदी मान्यवरांच्या बरोबरच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष मधुरा विप्र यांनी आगामी काळात गरजू नागरिकांसाठी १००० कॅटरॅक्ट  ऑपरेशन,विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी, तृतीय पंथीयांना रोजगार, पर्यावरण पूरक सँनिटरी पॅड वाटप.  व्यसन मुक्तीसाठी समुपदेशन इत्यादी समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे नमूद केले. 

छायाचित्र : मधुरा विप्र.