*स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे पुरस्कार जाहीर* *व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन ; भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी व महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती*

Share This News

पुणे : स्टेशनरी कटलरी अ‍ँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा भांडारकर रस्त्यावरील गिरीकंद ट्रॅव्हल्सचे विश्वास जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट विक्रेता, उत्कष्ट महिला व्यापारी, कै.साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस.एम.जोशी सभागृहात हा समारंभ होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला असोसिएशनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष सचिन जोशी, सचिव गणपतराज जैन, खजिनदार मोहन कुडचे, नितीन पंडित, मदनसिंह रजपूत, सुरेश नेऊरगावकर आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी हे असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे यंदा २४ वे वर्ष आहे.

शिरीष बोधनी म्हणाले, दरवर्षी २५ मे या व्यापारी एकता दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. व्यापारातून समृद्धी साधताना आपले कर्तृत्व सिद्ध करणाºया असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यापाºयांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सूर्यकांत पाठक म्हणाले, यंदाच्या वर्षी उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार नारायण पेठेतील दिप्ती कन्झुमर प्रोडक्टसचे मयूर शर्मा, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार घोरपडे पेठेतील अश्विनी मसाले च्या अश्विनी पवार आणि कै. साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार तुळशीबागेतील एस.एम.लांजेकर च्या दिक्षा लांजेकर-माने, फिनिक्स पुरस्कार स्वानंद एजन्सीचे कुमार शिंदे आणि उत्कृष्ट दुकान पुरस्कार लोखंडे तालीम जवळील अंबिका स्टोअर्सचे राहुल छेडा यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे.

दुकानातील स्वच्छता, सादरीकरण, आधुनिकता आणि ग्राहकांशी संबंध आदी गोष्टी पाहिल्या जातात. तसेच व्यापा-यांच्या उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्कारार्थींची निवड समितीतर्फे केली जाते. यापूर्वी गुडलक सेल्स डेपोचे खिमजी गाला, दोराबजी अ‍ॅन्ड कंपनीचे थ्रिटी पूनावाला आणि फरशिद पटेल, कॉटन किंगचे प्रदीप मराठे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, सुदर्शन स्टेशनरीचे कृष्णचंद्रजी आर्य (करमचंदानी), लक्ष्मीनारायण चिवडा कंपनीचे बाबूशेठ डाटा, जवाहर टेÑडींग कंपनीचे चकोर गांधी, जयराज ग्रुपचे राजेश शहा आदींना व्यापारभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.