भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप युवा फोरम पुणे परिवारच्या वतीने वाहतूक जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ५०० हून अधिक युवा सदस्यांनी महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक जनजागृतीसाठी पुणेरी पाट्याद्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. गंगाधाम चौक येथे झालेल्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बिरेन शहा, आशीष शहा, अमोल झवेरी, युवराज शहा, कल्पेश देसाई, सौरभ शहा, तसेच युवा नेते पार्थ शहा, सिद्ध शहा, खुशबू शहा, सुहानी शहा आदी बरोबरच युवा सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप नगरसेवक प्रवीण चोरबोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर व युवा.