*जिद्द फाऊंडेशन व पुणे सोशल फाऊंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.*

Share This News

पुणे – जिद्द फाऊंडेशन व पुणे सोशल फाऊंडेशनचा ” कै. लक्ष्मण शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा ” नुकताच संपन्न झाला. पुरस्काराचे यंदा १० वे वर्ष होते. यावेळी संस्थेच्या वतीने आदर्श नगरसेवक, पुणे भूषण, पुणे गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन व निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय चोरडिया, डॉ. दत्ता कोहिनकर, मा. प्रशांत जगताप, ॲड. गणेश सातपुते, श्री. दिपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक अध्यक्ष श्री. संजय लक्ष्मण शिंदे व जिद्द फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष श्री. संकेत संजय शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक श्री. मोहन खटावकर आणि आभार प्रदर्शन प्रा. भिमराव अडसूळ सर यांनी केले.
आजपर्यंत संस्थेने गेल्या १० वर्षात २६० व्यक्तींना व ७५ शिक्षकांना सन्मानित केले आहे.