पुणे, ता. १२ : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त उपशहरप्रमुख आनंद गोयल यांच्यावतीने भिक्षेकरी यांच्यासाठी मोफत लसीकरण योजनेचा शुभारंभ डॉ.गोऱ्हे व सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री राहुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी आज नीलमताईना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. आज आ. डॉ. गोऱ्हे यांच्या मातोश्री लतीकाताई गोऱ्हे यांनी त्यांचे औक्षण केले. सोबत भगिनी झेलम जोशी, मुलगी मुक्ता, भाची रोशनी यांनीही शुभेच्छा दिल्या.
आज ना. डॉ. गोऱ्हे यांचे पत्राद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तर दूरध्वनी वरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, श्रीनिवास पाटील, आ.दुष्यंत चतुर्वेदी, आ.विलास पोतनीस यांनी अभिनंदन केले.
प्रत्यक्ष भेट : पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, मा. नगरसेवक अशोक हरणावळ, शाम देशपांडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, स्वाती ढमाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राहुल कलाटे, मीनल यादव, वैशाली मराठे, युवराज शिंगाडे, शादाब मुलाणी, उद्योजक जव्हार चोरगे, राजू विटकर, युवासेना मा. उपजिल्हाप्रमुख तुषार सोनावणे, महिला आघाडीच्या सविता मते, सुदर्शना त्रिगुणाईत, युवासेना सहसचिव शर्मिला येवले, युवासेनेचे राजेश पळसकर, कुणाल धनकवडे, छाया भोसले, संतोष गोपाळ, प्रशांत राणे, उपजिल्हाप्रमुख कुलदीप कोंडे, अमोल पंगारे, अविनाश बलकवडे, प्रवीण डोंगरे, बाळासाहेब मालुसरे, अभिनेत्री रश्मी पाटील, डॉ.अमोल देवळेकर, आकाश चतुर्वेदी, गोविंद गोळवे, संतोष गोपाळ, विलास सोनवणे, किरकीटवाडी सरपंच गोकुळ करांजगावने आदी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावागावातून मोठी गर्दी करून शुभेच्छा दिल्या यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात आले.
सांगली जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महिला आघाडीच्या सुनिता मोरे, अहमदनगर जिल्ह्यातून पाथर्डीचे विष्णुपंत पवार आदी उपस्थित होते.