पुणे: औंधमधील मोदि जींची मुर्ती रातोरात हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे महाआरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले.
मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ केली आहे, ती कमी करण्यासाठी मोदी देवाचा धावा यानिमित्ताने करण्यात आला.
औंध येथील मोदिजींचे मंदिर त्याच जागी बांधले जावे आणि केंद्र सरकारने या मंदिराचा जिर्नोद्धाराचा खर्च उचलावा अशी मागणी या वेळी कसबा शिवसेना मतदार संघातर्फे करण्यात आली.
मोदिभक्त मयुर मुंडे यांना त्या मंदिराचे मुख्य पुजारी केले जावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली .
कसबा शिवसेना मतदार संघा तर्फे प्रसाद वाटप दांडेकर पूल येथील सद्गुरु मांगीर बाबा मंदिराच्या
येथे करण्यात आले .
यावेळी शिवसैनिकांकडून आता तरी महागाई कमी करशील का ? महागाई ने कंबरडे मोडले आता तरी देव पावशील का ? अश्या घोषणा देण्यात आल्या.
या वेळी शिवसेनेचे पुणे शहर प्रमूख संजय मोरे,राजेंद्र शिंदे, अनंत घरत, प्रतीक अल्हाट, युवराज पारीख, गौरव सिन्नरकर, राहुल जेगटे व कसबा शिवसेना मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.