वाशी येथील ग्रामीण रुग्णालये व कोवीड सेंटर मध्ये आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ठ सेवा करणाऱ्या परिचारीकांचा वैद्यकीय अधिक्षक डॉ.कपिलदेव पाटील व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, प्रत्येक वर्षी बारा मे हा दिवस फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 12 मे 1820 या दिवशी दिपधारी स्त्री फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा इटाली येथे जन्म झाला होता.1854च्या युद्धात जवळपास 18000 जखमी सैनिकांची काळजी घेत दिव्याच्या प्रकाशात सुश्रुषा केली. त्यानी आधुनिक परिचारिका सेवेचा पाया घातला. सद्या कोरोना रोगाने मरण पावलेल्यांची संख्या वाढत असून अशा कठीण परिस्थितीतसुध्दा परिचारिका इमाने इतबारे जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत. औरंगाबाद येथील ब्रिलियन्स रिसर्च अँड व्हिजीनरी एजुकेशनल सोसायटी(ब्रेव्ह)तर्फे ‘कोविड योद्धा’ म्हणून प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या वेळी ब्रेव्ह सोसायटीचे सल्लागार समन्वयक प्रा.शहाजी चेडे यांच्या सोबत डाँ.अमर तानवडे, डाँ.सचिन पत्की, डाँ.सुवर्णा शेलार,संतोष बुधोडकर व परिचारिका हजर होत्या.
आरोग्य सेवेचा हा दिवा परिचारिका व आरोग्य सेविकेच्या माध्यमातून तेवत राहतो हे लक्षात घेऊन माने रेश्मा, इंगळे माधुरी, गवळी स्वाती, वडगांवकर शैलजा, बोराडे कोकिळा, सोनवणे बोधवर्धिनी, वाघमारे प्रगती, नागरे राजुबाई व काही ब्रदर्स परिचारकांचा ब्रेव्ह सोसायटीने सन्मान केला.
येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर ब्रेव्ह सोसायटी कोरोना योध्यांना सन्मानित करणार आहे असे संचालक प्रा. जीवन गाडे यांनी नमूद करून ब्रेव्ह सोसायटी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या सर्व योध्यांच्या कार्यात ब्रेव्ह सोसायटी सहभागी असल्याचे व त्यांच्या कार्याला नतमस्तक असल्याचे सांगितले. तसेच प्रा. शहाजी चेडे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पूर्ण केला त्याबाबदल त्यांच्या कार्याला संस्थेचे संचालक प्रा.जीवन गाडे, उपसंचालक पावन गाडे, सचिव सायली लोंढे, सल्लागार समिती तर्फे डॉ. त्र्यंबक पाटील, डॉ. आतुल साळुंके, मुख्य अग्निशमन अधिकारी अहमदनगर श्री. शंकर मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या.