पुणे दि.२८ : कोव्हिडं-१९ च्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदारांसाठी विशेष १ कोटींचा निधी मजूर केला आहे. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
तसेच सदरील १ कोटीतुन ६५ लक्ष निधी ना.डॉ.गोऱ्हे यांनी पुण्यासाठी जाहीर केला आहे. यात
◆ *पुणे शहर*-
*ससून रुग्णालय, पुणे* येथे एनआयसीयु आणि एमआयसीयू व्हेंटिलेटर साठी– २५ लक्ष रु दिले आहेत. तर
*पुणे महापालिका* अंतर्गत इस्पितळासाठी ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन रेग्युलेटर, बायपँप मशीन, १० लक्ष रु, एनआयसीयु व्हेंटिलेटर– १५ लक्ष रु असा एकूण २५ लक्ष रु निधी उपलब्ध करू दिला आहे.त्याचबरोबर
◆ *पुणे ग्रामीण*-
पुणे जिल्हापरिषद सदस्य शैला राजू खंडागळे यांच्या विनंतीनुसार देहू, जि. पुणे प्राथमिक आरोग्य केंद्रकरिता रुग्णवाहिकेसाठी १५ लक्ष रु निधी ना.डॉ गोऱ्हे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंजूर केला आहे. याबाबत पुणे शहर आणि ग्रामीण पदाधिकारी यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर पुढील काळात देखील शासकीय रुग्णालयांना अधिकाधिक मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध आहेत असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.