केअर टेकर्स सोसायटी व लष्कर पोलीस ठाणे यांच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये कोबिड लसीकरण करण्या साठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना वितरण केंद्रापासून घरापर्यंत मोफत वाहन सेवा देण्यात येत आहे .
केअर टेकर्स सोसायटीच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, मतिमंद , अपंग लोकांसाठी करण्यात येत आहे आज वाहनांचा शुभारंभ गोळीबार मैदान येथील सरदार वल्लभ भाई पटेल रुग्णालयात करण्यात आला.
या सेवेचा फायदा व्हावा यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट भागातील प्रत्येक चौक , गल्ली मध्ये जाऊन संगणार आहे.
या वेळेस लासिकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या प्रकारचे न्याहरीचे पॅकेट द्यायचे नियोजन आहे. आज बुधानी वेफर्स देण्यात आले .
सदर मोफत वाहन सेवा केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे यांचा संकल्पनेतून करण्यात येत आहे
मोफत वाहन सेवेचा शुभारंभ लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम साहेब, उपनिरीक्षक लोखंडे साहेब, केअर टेकर्स चे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी केले ,
उद्धाघटनाच्या वेळेस अशोक कदम यांनी सांगितले कोरोनावर मात करायचे असेल तर लस हाच एकमेव उपाय आहे, ती सर्वांनी अवश्य घ्यावी.
लसीकरण करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना न्याहारी चेपाकीट वाटप गिझल अन्सारी व गणेश चित्ते यांनी केले
डॉ छाबरा साहेब, डॉ महेश यांनी ज्येष्ठ नागरिक, मतिमंद,अपंग लोकांसाठी चालू केलेल्या मोफत वाहन उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाशिधर पुरम यांनी केले.
विजय बेलिटकर, इरफान मुल्ला,,अमोल बागल,, रणजित परदेशी, आणि पोलीस खात्यातील अनेकमान्यवर उपस्थित होते ., वकील.सुफीयन शेख
यांनी उपस्थितांचे आभार मानले—-