रोटरी शिवाजीनगरच्यावतीने सीमेवरील सैनिक,मनपा आरोग्य विभाग,व दीनानाथ मंगेशकर येथील डॉक्टर्स व पोलिस अधिकारी यांना शांतता पुरस्कार प्रदान.

Share This News

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर व डेव्हलपमेट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणाली द्वारे हे प्रदान करण्यात आले. या प्रसंगी प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपूर,रोटरी क्लब शिवाजीनगरचे अध्यक्ष रो.शरद डोळे, माजी अध्यक्ष प्रदीप वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारार्थी – पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या डॉ.अंजली साबणे, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस राजेंद्र कदम, लेह लडाख येथे सेवा बाजवणारे लष्करी जवान लान्स नायक अरविन्द पाटोळे, दीनानाथ रुग्णालयाच्या कोविड टिमचे प्रमुख डॉ.समीर जोग. यातील जवान लान्स नायक  अरविन्द पाटूळे यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी शांतता पुरस्कार प्रदान केला.तर डिवायएसपी राजेंद्र कदम यांना प्रदीप वाघ यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे पुरस्कार प्रदान केला. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष शरद डोळे यांनी हा पुरस्कार गेली चार वर्ष शांतते साठी कार्य करणार्‍या मान्यवरांना दिला जातो असे संगितले. पुरस्कारार्थिनी आपल्या कामाची दखल समाजाने घेतल्या बद्दल आनंद व्यक्त केला तसेच आपले अनुभव संगितले.  

छायाचित्र :डावीकडून प्रदीप वाघ, अलका जोशी, दीपक शिकारपूर, अंजली साबणे, शरद डोळे.