मावळ तालुक्यातील माले गावात आज तहसीलदार कार्यालय मावळ व जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने महा राज्यस्व अभियाना अंतर्गत शासन आपल्या दारी योजनेमध्ये मावळ तालुक्यात शासनाच्या विविध विभागाचे १५ प्रकारचे दाखले वाटप कार्यक्रम घेणेत आला. त्याचे उदघाटन करताना प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ नीलम ताई गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी अभय चव्हाण तहसीलदार,संदेश शिर्के प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे तसेच युवसेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे,शिवसेना जिव्हाप्रमुख रमेश कोंडे, स्वाती ढमाले व मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक हजर होते.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात जाऊन त्यांना आवश्यक असणारे दाखले मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे या अभियानाला खूप महत्व आहे. सामान्यांना एकाच छताखाली हे दाखले तात्काळ मिळण्याची सोय झाली आहे. व दाखलेही तात्काळ मिळत आहेत. यासाठी पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि जिल्हाधिकारी पुणे यांचे मोलाचे सहकार्य राहीले. त्यांच्या प्रयत्नातून संयोजक अविनाश बलकवडे,स्वाती ढमाले,रमेश कोंडे यांनी हे शिबिर घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे.
या शिबिरात महसूल,एसटी महामंडळ, वीज महामंडळ, पॅन कार्ड, पुरवठा विभागाचे रेशन कार्ड ची कामे करण्यात येत आहेत. हिंदुहृदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराने काम करताना ८०% समाजकारण हेच लक्ष समोर ठेवणेत आलेले आहे. असे ही डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
*गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम आहे.यामध्ये शासन स्तरावरून मदत करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल असे ही त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले.* तसेच आज देखील सेनापती बापट यांनी सुरू केलेल्या संघर्षाची आठवण नक्कीच आहे.त्यांच्या विचाराप्रमाणे महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे असे नीलमताई गोर्हे म्हणाल्या.
*मुळशी तालुक्यासाठी संयोजकांचे विनंती नुसार रु ११ लाख डॉ गोऱ्हे यांचे स्थानिक विकास निधीतून अपंगांच्या शाळेसाठी किंवा रूग्णवाहिकेसाठी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले*
तहसीलदार, प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या या प्रयत्नाचा व बलकवडे,स्वाती ढमाले व रमेश कोंडे यांचे संयोजनाबाबत डॉ गोऱ्हे यांनी शासनाचे वतीने अभिनंदन ही केले.