युवा सेनेच्या वतीने मोदी गणपती येथे आरोग्य तपासणी शिबीर.

Share This News

पुणे (दि.२०) युवा सेनेच्यावतीने मोदी गणपती चौक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात मधुमेह,संधिवात,ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन,कोलेस्टेराल यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात ८६ नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी,ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन साठी ३२,कोलेस्टोराल साठी ३२ तर संधिवातासाठी १० नागरिकांची मोफत तपासणी केली.या प्रसंगी युवासेनेचे  कसबा प्रमुख निरंजन दाभेकर,राष्ट्रवादी कोंग्रेस प्रवक्ता अंकुश काकडे,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,बाळासाहेब जाधव,महेश वाघ,राजेंद्र पंडित,नीलेश वावरे,राजेंद्र लवाटे,मेडिपॉइंट हॉस्पिटलचे डॉ.गिरिष भाटीया,डॉ.मनोज सिंग,योगिता रिठे आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना डॉ गिरिष भाटीया यांनी कुठल्याही आजारचे निदान जितके लवकर होईल तेव्हडे योग्य उपचार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते असे प्रतिपादन केले. 

छायाचित्र :शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर .